एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन

Foto
दीडशे विद्यार्थ्यांचा सहभाग

पैठण, (प्रतिनिधी) एमआयडीसी पोलीस स्टेशन तर्फे आजच चित्रकला स्पर्धेत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जिल्हा परिषद शाळा ढोरकिन जिल्हा परिषद शाळा जायकवाडी, नागनाथ शाळा वाहेगाव, भीमाशंकर शाळा जैन स्पिनर फाटा, तुकाराम हायस्कूल ढाकेफळ, आर्यनंदी पब्लिक स्कूल ढोरकिन, जिल्हा परिषद शाळा बालानगर या शाळेतील दीडशे विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशनला येऊन चित्रकला स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला.

 विजेता स्पर्धकांना एपीआय भरत मोरे यांच्या हस्ते क्रमांक एक क्रमांक दोन आणि क्रमांक तीन असे बक्षीस आणि प्रमाणपत्र देण्यात आले आहे. यावेळी पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना रायफल व पोलीस स्टेशन विजिट सुद्धा दाखविलेली आहे.